नागपूर शहर: सावधान! खापरखेड्यात तोतया पोलिसांकडून भरदिवसा ४.३५ लाखांचे दागिने लंपास
स्वतःची ओळख पोलीस असल्याची सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना वारेगाव परिसरात घडली आहे. फिर्यादी हिरामण पाटील हे आपल्या शेताकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना थांबवले. "आम्ही पोलीस आहोत, चोरीच्या घटना वाढत आहेत, तुमचे दागिने काढून डिक्कीत ठेवा," असे सांगून आरोपींनी त्यांना विश्वासात घेतले.