अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील वर्तमान परिस्थितीशी संघर्ष करून परंपरागत शेती व्यवसाय आणि यासोबतच शिक्षणाची कास धरून यशोशिखर गाठणाऱ्या सामोडे ता. साक्री येथील मोहित नारायण सोनवणे या तरुणाने गरुड झेप घेत थेट जलसंपदा विभागात सिंचन सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मोहित हा सामोडे येथील बांधकाम मिस्तरी नारायण पुंडलिक सोनवणे यांचा मुलगा असून आपल्या वडिलांसोबत शेती व्यवसायात मदत करतांनाच गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात