नंदाई फाऊंडेशन च्या वतीने शहरातील विंजासन येथील जगन्नाथ मंदिरात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात ८८ रुग्णांनी आपली तपासणी करवून घेतली.शिबीरात मानसीक तथा अन्य रोगांची तपासणी करण्यात आली. कुबेर हास्पिटल, चंद्रपुर च्या मानसीक तज्ञ डा.साची बंग व माऊली क्लिनीकचे डा.अनंत मत्ते यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केला.