नागपूर शहर: सदरमधील चैन स्नैचिंगचा गुन्हा २४ तासांत उघड; गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
21 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रदीप नर्सरीमध्ये झालेल्या चैन स्नैचिंगची घटना गुन्हे शाखा सोनसाखळी विरोधी पथकाने अवघ्या एका दिवसात उघडकीस आणली आहे. ग्राहक बनून आलेल्या एका तरुणाने ६७ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र पळवले होते. रोहित मारबते याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीकडून १३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.