नागपूर शहर: फुटाळा तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू
प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटाळा तलाव परिसरात शनिवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे फिरायला आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिकांना तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच अंबाझरी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.