एरंडोल: गालापूर येथून एरंडोल कडे येणाऱ्या रस्त्यावर पाटचरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार,एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा
एरंडोल तालुक्यात गालापुर हे गाव आहे. त्या गावाकडून एरंडोल कडे येणाऱ्या रस्त्यावर अमोल तिवारी यांच्या शेताजवळ पाटचारी आहे या पाटचारीच्या जवळ दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ए.डी.०२२८ द्वारे शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी वय ३८ हा येत होता दरम्यान अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे