लातूर: मुख्याध्यापकाची बदली रद्द करा! — मनपा शाळा क्र. 9 च्या विद्यार्थ्यांचे महानगरपालिकेसमोर आंदोलन
Latur, Latur | Oct 9, 2025 लातूर -महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 9 मधील मुख्याध्यापक शिंदे यांची बदली झाली असून या निर्णयाविरोधात आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता विद्यार्थ्यांनी थेट लातूर महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. “मुख्याध्यापकांची बदली रद्द करा” अशी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.मुख्याध्यापक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा निकाल आणि उपक्रमांमध्ये सतत प्रगती होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.