ताडकळस येथील शेतकरी मारोती दळवी यांचा गुरुवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना नशेत विनामोबदला शेतीच्या खरेदी खत केल्यावरुन घडली असल्याची लेखी तक्रार मयत शेतकरी मारोती दळवी यांच्या पत्नी आशा मारोती दळवी यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात दिली, या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आज शुक्रवार १९ डिसेंबर रोजी 12 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.