आज चिन्ह वाटप , प्रचाराला मिळणार वेग वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत दाखल तीन आक्षेपांवरील सुनावणी प्रक्रिया काल २५ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली असून आज २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटपासह अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. यामुळे आतापर्यंत चिन्हाशिवाय प्रचार करणाऱ्या अपक्ष उमेदवारांसह मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळून प्रचाराचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे, चिन्ह मिळाल्यानंतर केवळ पाच दिवसांच