फलटण: कराड पाठोपाठ फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतला आक्षेप
Phaltan, Satara | Oct 13, 2025 फलटण नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संभाव्य घोळाबाबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून सावध केले होते, ही माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता ही माहिती दिली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मतदारांचे तातडीने 'स्पॉट व्हेरिफिकेशन' अर्थात प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.