महागांव तालुका मराठी पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान जाहीर करण्यात आली आहे. महागाव येथील सतिश मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते ही कार्यकारणी गठीत झाली. यात अध्यक्षपदी रजतकुमार खाडे, उपाध्यक्षपदी सदानंद जाधव, सचिव म्हणून श्रीकांत राऊत यांची सर्वानुमत्ते निवड झाली. या निवड प्रक्रियेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांनी आनंद व्यक्त करत नव्या कार्यकारिणीचे स्वागत केले.