आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे.कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर देखील अनेक वर्षांपासून त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा केला जातो आणि घराघरातून पणत्या आणि दिवे आणून दुर्गाडी किल्ल्यावर लावल्या जातात. त्यामुळे दुर्गाडी किल्ला उजळून जातो. आज देखील हजारो दिव्यांच्या रोषणाईने दुर्गाडी किल्ला उजळलेला पाहायला मिळाला. तसेच त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त अनेक कल्याणकर नागरिकांनी दुर्गडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.