जालना: जालन्यात पुन्हा गोळीबार!
जामवाडी शिवारात ‘भोग्या’वर गोळीबार; अतिष पाटोळे जखमी, परिसरात खळबळ
Jalna, Jalna | Sep 7, 2026 जालना शहराच्या बगलात असलेल्या जामवाडी शिवारात काल रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतिष प्रकाश पाटोळे उर्फ ‘भोग्या’ याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारात अतिष पाटोळे जखमी झाला असून, गोळी कमरेच्या आरपार जाऊन हाताला लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेनंतर जखमी अतिषला तातडीने जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सचिन आर्य, मदन गायकवाड आण