निफाड: पिंपळगाव बसवंत शहरात 'मुंबई लोकल' सिनेमाचे अभिनेता प्रथमेश परबने केले प्रमोशन
Niphad, Nashik | Aug 4, 2025 सुप्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या आगामी मुंबई लोकल या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात आज सोमवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता दाखल होऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. पिंपळगाव हायस्कूल व स्वर्गीय डी.पी. पाटील महाविद्यालय येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी यावेळी अभिनेता परब याने संवाद साधत सदरचा चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन पहावा अशी आवाहन केले.