शहराची स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणाची शाश्वत जपवणूक ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची ही सामूहिक जबाबदारी आहे याच भावनेतून गुलमोहर रोड येथील रेणुका नगरातील मनपाच्या ओपन स्पेस मध्ये गेला काही दिवसापासून निर्माण झालेली अस्वच्छता कचरा आणि दुर्गंधीची समस्या तातडीने सोडवण्यासाठी माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपाय मध्ये कचरा साठवून राहिल्याने परिसरात डास कीटक दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली होती