लातूर: स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून होणार उद्यानांचा विकास आयुक्त श्रीमती मानसी यांच्या संकल्पनेला संस्थांचे पाठबळ
Latur, Latur | Nov 26, 2025 विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील ग्रीन बेल्टमध्ये उद्यानांचा विकास करण्याची संकल्पना मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी मांडली.विविध संस्थानी त्यास पाठबळ दिले असून यामुळे शहरात आता उद्यानांचा विकास गतीने होणार आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी शहरात उद्याने असणे गरजेचे आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील उद्यानांची आवश्यकता आहे.