नागपूर शहर: अंबाझरी तलावात आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचे प्राण वाचवले : चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी 18 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी तलावात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका आई आणि मुलीला बजाजनगर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलने आपल्या प्रसंगावधान आणि तत्परतेने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. या धाडसी कामगिरीमुळे दोन्ही महिलांचे प्राण वाचले असून, सर्व स्तरांतून पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी दिली आहे.