बोदवड: पिंप्री नांदू जवळील तापी नदीच्या पात्रात जळगावच्या तरुणाचा मृतदेह आढळला,मुक्ताईनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Oct 22, 2025 पिंप्री नांदू या गावाच्या जवळील तापी नदीच्या पात्रात विनोद विजय भिसे वय ३८ राहणार जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे नेण्यात आला तर याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.