जालना: भरधाव क्रुझरची छोटा हत्तीला धडक; शेतकरी गंभीर जखमी; अंबड-जालना मार्गावरील कुंभेफळ फाट्याजवळ अपघात; टोमॅटोचे मोठे नुकसान
Jalna, Jalna | Sep 27, 2026 सामनगाव येथून टोमॅटो घेऊन जालन्याकडे निघालेल्या छोटा हत्ती वाहनाला मागून भरधाव वेगाने आलेल्या क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात छोटा हत्ती वाहन रस्त्यावर पलटी झाले असून त्यामधील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवार दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाहनात बसलेले शेतकरी सोपान हरिचंद्र चिरखे हे गंभीर जखमी झाले असून चालक सुधाकर जगन्नाथ शिंदे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.