रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबागच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना, पक्षकारांना आणि वकिलांना राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त खटले निकाली काढून त्याचा लाभ घेण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे. न्यायालयात प्रलंबित असणारे तसेच दाखलपूर्व खटले सामंजस्याने, तडजोडीने व कमी वेळेत निकाली काढण्यासाठी ही राष्ट्रीय लोक अदालत शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. कशासाठी आहे ही लोक अदालत? या लोक अदालतीमध्ये खालील