बागवानपुरा मधील अरेबिया हिदायतुल इस्लाम सिकंदर मदरसामध्ये विशेष लसीकरण मोहिमेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
1.7k views | Washim, Washim | Sep 29, 2025 वाशिम (दि.२९,सप्टेंबर): वाशिम शहरातील UPHC यांच्या वतीने मदरसा अरेबिया हिदायतुल इस्लाम सिकंदर, बागवानपुरा, वाशिम येथे एम.आर. लसीकरण विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 41 विद्यार्थ्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले.या लसीकरण शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.ढोले, डॉ. पडघने, तसेच आरोग्य सेविका अश्विनी सरकटे व कल्पना लबडे, आरोग्य सहाय्यक श्री. सोनवणे व आरोग्य सेवक प्रशांत गोटे, संदेश भगत आणि सय्यद एजाज यांचा सक्रिय सहभाग होता.