मोर्शी: गांधी चौक मोर्शी येथे नूतन दुर्गोत्सव मंडळ व रक्तदाता संघ यांचे वतीने,रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न
गांधी चौक येथे नूतन दुर्गोत्सव मंडळ व रक्तदाता संघ मोर्शी यांचे वतीने आज दिनांक 27 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 24 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरातून रक्तदान केले. याप्रसंगी नूतन दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने डॉक्टर प्रमोद पोतदार यांचा सत्कार देखील करण्यात आला. रक्तदाता संघ व नूतन दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते