घनसावंगी: जालना जिल्ह्यात उन्हाचा तडाखा; 40-41 अंश तापमानातही बाजारात महिलांची गर्दी..
जालना जिल्ह्यात उन्हाचा तडाखा; 40-41 अंश तापमानातही बाजारात महिलांची गर्दी.. आज दिनांक 1 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा कडक उन्हातही घनसावंगी आणि अंबड येथील बाजारपेठांमध्ये नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. दुपारच्या कडक उन्हातही खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलांना उष्म्याचा त्रास सहन करत आपली दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. डोक्यावर ओढणी,