समुद्रपूर: गणेशपुर पारधी बेड्यावर पोलिसांची गावठी दारू विरोधात मोठी कारवाई, १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट
समुद्रपुर पोलिसांनी गणेशपुर पारधी बेड्यावर पोलिसांची गावठी दारू विरोधात मोठी कारवाई करीत १लाख २३ हजार ७०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली प्राप्त माहितीनुसार समुद्रपुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रविंद रेवतकर यांना गणेशपुर पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचे गाळपाण होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली असता झाडाझुडपात मोठ्या प्रमाणात मोहा सडवा आढळून आला यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.