समुद्रपूर: ताडगाव येथे शासनाच्या संतृप्ती शिबिराचे यशस्वी आयोजन:शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
समुद्रपुर:शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्याची तात्काळ अमलबजावणी करून त्याचा त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभिया अंतर्गत संतृप्ती शिबिराचे आयोजन जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडगाव येथे करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटक म्हणून उपविभागीय अधिकारी विलास नरवडे तर अध्यक्षस्थानी तहसीलदार कपिल हाटकर,तर भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जनार्दन बोंतले,पुरवठा अधिकारी कुमरे, नायब तहसीलदार संजय काटपातर, मंडळ अधिकारी कापकर आदी उपस्थित होते.