समुद्रपूर: बोथली शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार: शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान
गिरड: बोथली शिवारात वाघाने चरत असलेल्या गायीवर हल्ला चढवित गायीला जागीच ठार केल्याची घटना २८ जुन रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बोथली येथील शेतकरी अरुण खडसे यांचे जनावरे चरत असताना झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवित गायीला जागीच ठार केले. या घटनेची माहिती शेतकऱ्याने गिरड येथील वनविभागाला देताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पि.डी.बेले, वनमजूर रंगनाथन कुंभारे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.