नागपूर शहर: खापरखेडा परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; भरदिवसा बकरा लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून, चोरट्यांनी आता थेट भरदिवसा चोऱ्या करण्याचे धाडस सुरू केले आहे. चोरट्यांनी आता थेट जनावरांना आपले लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. येथे एका बकऱ्याला चोरट्यांनी भरदिवसा लंपास केले.