तिरोडा: महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा येथे दिली भेट
Tirora, Gondia | Oct 16, 2025 महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी दिं. १६ ऑक्टोंबर ला गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील नावाजलेली शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा येथे भेट दिली.दुर्गम व प्रतिकूल परिस्थितीत वावरणाऱ्या आदिवासीबहुल खरा वस्तीत शिक्षणाचं अंकुर पेरणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्राला महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी 'वेल्डन खर्रा' असा कौतुकाचा शेरा देऊन गौरविण्यात आले.