नागपूर शहर: तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू
21 मे ला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोन अनोळखी पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हे मृत्यू उष्मघाताने झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.