*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘हेल्थ अँड फिटनेस वीक’चे भव्य आयोजन* *मतदार जनजागृतीसह आरोग्य व तंदुरुस्तीचा प्रभावी संदेश* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.पी.एड. शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रांगणात ‘हेल्थ अँड फिटनेस वीक’ चे भव्य आयोजन करण्यात आले. आरोग्य, तंदुरुस्ती, शारीरिक शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.