जळगाव: ड्रायव्हर निघाला 'खबरी', भुसावळ दरोडा प्रकरणाचा ४८ तासांत छडा, ६ आरोपी जेरबंद, एसपी महेश्वर रेड्डी यांची माहिती
खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाला दुचाकीवर असलेल्या तीन जणांनी रस्ता आडवून २५ लाख रुपयांच्या लुट केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यात कंपनीत काम करणारा ड्रायव्हरच हा दरोड्याचा मुख्य सुत्राधार असल्याचे निष्पन्न झाले असून या गुन्ह्यात एकुण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २३ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. अशी माहिती एसपी महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.