नागपूर शहर: सावधान! नागपुरात विद्युत काम करताना धक्का लागून ६३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दुर्दैवी घटनेत ६३ वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. दिलीप दादाराव बेलेकर वय ६३ वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.7 जुलै रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास, दिलीप बेलेकर हे जोगी नगर येथील स्वप्नील चव्हाण यांच्या घरी इलेक्ट्रिकलचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.