फलटण: फलटणच्या घटनेवर राजकारण; निष्कारण फलटणची बदनामी : आमदार सचिन पाटील यांचा विरोधकांवर आरोप
फलटण येथील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याबाबत शासन निश्चित कारवाई करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र, विरोधक या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून त्यातून फलटणचे बदनामी होत आहे, हे दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांनी म्हटले आहे. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न करता विरोधक शहराची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.