लातूर: धरणातून मोठा विसर्ग — मांजरा नदीपात्रात वाढला पाण्याचा वेग, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
Latur, Latur | Oct 5, 2025 लातूर : गेल्या काही दिवसापासून मांजरा धरणपात्रात पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणाच्या पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज रविवार पाच ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता गेट क्रमांक 1,2,3,4,5 व 6 (हे 6 गेट) 0.50 मीटरने उचलण्यात आले आहेत.