अर्धापूर: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कलदगाव येथे संतोष गव्हाणेचे अन्नत्याग आंदोलन सुरू
मागील दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच मागील उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हा कोल लमडून पडला असून राज्य शासनाच्या वतीने अतिशय अल्प मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांची काळी दिवाळी पहाट हे स्लोगन समोर ठेवत कलदगाव येथे शेतकरी पुत्र संतोष गव्हाणे हे अन्नत्याग आंदोलन करत असल्याची माहिती आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्या निकटवर्तीकडून प्राप्त झाली आहे.