जत: बेळोंडगी येथे तलावात पडून आई व लहान मुलीचा मृत्यू
Jat, Sangli | Aug 21, 2025 बेळोंडगी (ता. जत) येथे खेळत असताना दोन वर्षांची मुलगी शेत तलावात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात आईही तलावात पडली. पाण्याबाहेर पडता न आल्याने माय लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. २० रोजी दुपारी घडली. कावेरी आनंद संबर्गी (वय २०), लक्ष्मी आनंद संबर्गी (२) अशी या माय-लेकीची नावे आहेत. बेळोंडगी येथे कावेरी संबर्गी यांच्या घराशेजारी शेत तलाव आहे. बुधवारी दुपारी त्यांची मुलगी लक्ष्मी खेळत खेळत तलावातील पाण्यात पडली.