जालना: नानेगावात रस्त्यावर खड्डे आणि खड्यात पाणी; गावकर्याचे पडत्या पावसात खड्यात बसून आंदोलन
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जालना जिल्ह्यातील नानेगाव येथील गावात आणि झोपडपट्टी भागात नागरी सुविधांची मोठी समस्या असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरीकानां मोठे हाल सहन करावे लागत आहे. बुधवार दि. 8 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंकुश चव्हाण आणि गावकरी यांनी चक्क रस्त्यावरील खड्यात साचलेल्या पाण्यात बसून पडत्या पावसात तिव्र आंदोलन केले. अंकुश चव्हाण यांनी केलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाभरात चर्चा सुरु झाली,नानेगाव येथे नागरी समस्या आहे.