कराड: कराड नगरपालिकेचा गौरवशाली १७० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; संपूर्ण शहरातून काढली जनजागृती रॅली
Karad, Satara | Sep 15, 2025 कराड नगरपालिकेच्या गौरवशाली १७० व्या वर्धापन दिनानिमित्त नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शहरातून जनजागृतीपर रॅली काढली. रॅलीमध्ये पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिकेपासून सुरू झालेली ही रॅली कॉटेज हॉस्पिटल, दत्त चौक, चावडी चौक, कन्याशाळा मार्गे पुन्हा पालिका कार्यालयात येऊन समाप्त झाली. पालिका सभागृहात मुख्याधिकारी व्हटकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.