नागपूर शहर: नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य 'समता बाईक रॅली'चे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपुरातील भीमशक्ती - शिवशक्ती समता विचार समितीच्या वतीने उद्या भव्य 'समता बाईक रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजात समता, एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला जाणार आहे.ही भव्य रॅली बुधवार, १५ एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता यशोधरा नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून प्रारंभ होईल. वतपर भटारा वसाहत आणि परिसरातील विविध भागांतून ही रॅली मार्गक्रमण करणार आहे.