हवेली: ‘वॉक विथ कमिशनर’ अंतर्गत आयुक्त शेखर सिंह यांचा पुर्णानगर येथे थेट नागरिकांशी संवाद.
Haveli, Pune | Jun 6, 2025 पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमांतर्गत आज पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान येथे भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी केले.