हवेली: वाहतूकीसाठी अडथळा ठरणारे गोळीबार मैदान जवळील रस्त्यावरील खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजवले
Haveli, Pune | Sep 16, 2025 गोळीबार मैदान या ठिकाणी कोंढवा रस्त्यावर खड्डे निर्माण झाले होते. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ही मंदावली होती. पावसामुळे हे खड्डे निर्माण झाले होते. यावेळी चक्क वाहतूक पोलिसांनी स्वतः हे रस्त्यावरील खड्डे बुजवले व यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ही सुरळीत झाली.