नागपूर शहर: नागपुरात अवकाळीचा तडाखा: कळमना बाजार समितीत पाणीच पाणी, उघड्यावरील शेकडो क्विंटल धान्य भिजले
विदर्भात मागील २४ तासांत हवामानाने अचानक कूस बदलली असून, काल रात्री नागपूर शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका आशियातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. बाजार आवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला गहू, हरभरा आणि डाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी कळमना परिसरात आणला होता.