फुलंब्री: राजनगाव ते पिरबावडा रस्त्याचे दुरावस्था, रस्ता दुरुस्तीसाठी सरपंच मंगेश साबळे यांचे पाण्यात बसून अनोखे आंदोलन
फुलंब्री तालुक्यातील राजनगाव ते पिरबावडा रस्त्याचे अत्यंत दुरवस्था झाली असून चिखलातून विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. त्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे. सदर रस्ता दुरुस्ती आठ दिवसात न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.