बोदवड: बोदवड शहरातील हिदायत नगर मधून ३४ वर्षीय तरुण झाला बेपत्ता, बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Sep 17, 2025 बोदवड शहरात हिदायत नगर आहे. या नगरातील रहिवाशी शेख फारुक शेख गयास वय ३४ हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी नमाज पडण्यासाठी जात आहे. असे सांगून मशिद मध्ये गेलेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, तो कुठेच मिळून आला नाही म्हणून बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.