नागपूर शहर: हंसापुरी खदान परिसरात ६ गोवंशियांची सुटका; आरोपी मुस्तकीम कुरेशी जेरबंद
17 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसिल पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या खबरीवरून हंसापुरी खदान, शिवाजी नाईट स्कूलच्या मागे धाड टाकली. तेथे आरोपी मुस्तकीम कुरेशी मुश्ताक अहमद कुरेशी याच्या घरी ६ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे, चारा-पाणी न देता बेकायदेशीर कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळली.पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या जनावरांना धंतोली येथील गोरक्षण केंद्रात दाखल केले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्या