अंजनगाव सुर्जी ते अकोट महामार्गावरील लखाड ते सातेगाव फाट्याच्या दरम्यान आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडून आला.टाटा कंपनीच्या ट्रेलर व टाटा ४०७ या वाहनात झालेल्या जोरदार धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून,ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.प्राप्त माहितीनुसार,एमएच ४६ बीबी ११२५ क्रमांकाचा टाटा ट्रेलर जलवाहिनीसाठीचे मोठे सिमेंटचे पाईप अंजनगावमार्गे अकोटकडे नेत होता. त्याचवेळी टाटा ४०७ हा अकोटमार्गे अंजनगाव कडे कापूस घेऊन येत असताना हा अपघात घडला.