बावधन पोलिसांची मोठी कारवाई; तीन चोरट्यांसह विधीसंघर्षित बालक ताब्यात
७ दुचाकी, २४ मोबाईलसह ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात वाहनचोरीचे गुन्हे उघड
पिंपरी-चिंचवड, दि. 3 : बावधन, हिंजवडी परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने शोधमोहीम सुरू केली होती.
पोलिसांचे पथक बावधन हद्द
Pune City, Pune | Aug 4, 2026