औंढा नागनाथ: नापिकी व बँक कर्जापाई टाकळगव्हाण येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या;औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
सततची नापिकी व बँकेच्या कर्जापाई औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील तरुण शेतकरी अमृता मारोतराव पावडे वय ४० वर्ष यांनी दिनांक ५ ऑक्टोबर रविवार होती दुपारी साडेबारा वाजे दरम्यान शेतातील आखाड्यावर लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी शिवकांता शिवाजी पावडे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून दिनांक ११ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता सुमारास औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे