Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;तब्बल १ कोटी २ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परंडा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. ५ जून २०२६ रोजी परंडा शहरातील हैदरअली रोड परिसरातील दाऊद फकिर पठाण यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी रो. दि. फंदी यांनी केलेल्या तपासणीत केआर-१००० गुटखा, के गुटखा, डायरेक्टर पानमसाला, व्ही-०६ रॉयल जाफरानी जर्दा तसेच एम सुगंधित तंबाखू यांसारख्या विविध प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. या ठिकाणाहून एकूण ७८ हजार ७५५ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. याच कारवाईदरम्यान प्रशासनाने परंडा येथील वावची चौकाजवळ असलेल्या समाधान खुळे व प्रदीप खुळे यांच्या मालकीच्या तीन गोडाऊनची तपासणी केली. या तपासणीत डायरेक्टर पानमसाला, राजनिवास पानमसाला, केएन-०१ जाफरानी जर्दा, हिरा पानमसाला, रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू, बादशहा, दिल्लगी सुपारी, व्ही-१ तंबाखू, तुलसी जाफरानी जर्दा, विमल पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, आरएमडी पानमसाला, केआर-१००० गुटखा यांसह अनेक प्रतिबंधित उत्पादनांचा प्रचंड साठा आढळून आला. या गोडाऊनमधून तब्बल १ कोटी १ लाख ८८ हजार ५०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. जप्त केलेला संपूर्ण साठा पोलीस स्टेशन, परंडा येथे सुरक्षित ठेवण्यात आला असून प्रत्येक उत्पादनाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. या प्रकरणात दाऊद फकिर पठाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ आणि ३२८ अन्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोडाऊन मालक समाधान खुळे व प्रदीप खुळे यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार संबंधित तीनही गोडाऊन सील करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रो. दि. फंदी, ग. शं. दत्तू (धाराशिव), एस. एस. सावंत (पुणे), धनंजय आघाव, सुमित खांडेकर, अभिजित झिंगर (सांगली), सी. आर. स्वामी व उमेश भुसे (सोलापूर) यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. ही मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार तसेच सह आयुक्त (अन्न) रा. करकळे आणि सहायक आयुक्त (अन्न) प्र. शा. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे परंडा परिसरातील प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. #Paranda #Dharashiv #FDA #GutkhaRaid #FoodAndDrugAdministration #ParandaNews #DharashivNews #GutkhaSeizure #TobaccoRaid #MaharashtraNews #VeerMaharashtraNews #BreakingNews #Tuljapur #OsmanabadNews #IllegalGutkhaRaid #वीरमहाराष्ट्रन्यूज #nextframenews #TukaramMundhe

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026