Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला यश; नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर तोडगा महाद्वार परिसरातील दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवानची परवानगी देण्याचे आश्वासन प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर शहरातील महाद्वार परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाराज झालेल्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मध्यस्थीने आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला असून दुकानदारांना एक फूट फुटपाथ व तीन फूट सायवान वापरण्याची परवानगी देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत काही आठवड्यांपूर्वी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या मोहिमेमुळे महाद्वार चौक व परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असल्या, तरी अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याची भावना व्यापारी वर्गात निर्माण झाली होती. दरम्यान, पावसाळा जवळ येत असल्याने दुकानाबाहेर ठेवण्यात येणारा माल सुरक्षित ठेवणे, ग्राहकांना संरक्षण मिळणे आणि व्यवसाय सुरळीत चालविणे या दृष्टीने व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तीन फूट फुटपाथ व पाच फूट सायवान वापरण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीवर तत्काळ निर्णय न झाल्याने भवानी रोड आणि महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे केली. मंदिर संस्थानमार्फत बंद करण्यात आलेला महाद्वार मार्ग पूर्ववत सुरू करून भाविकांना त्या मार्गाने प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. भाविकांची वर्दळ वाढल्यास स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळेल, असा व्यापाऱ्यांचा दावा होता. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून विषयाची माहिती दिली. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार व्यापाऱ्यांना एक फूट फुटपाथ आणि तीन फूट सायवान वापरण्याची परवानगी देण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील तणाव निवळला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था, भाविकांची सोय आणि व्यापाऱ्यांचे हित यांचा समतोल साधत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. #तुळजापूर #Tuljapur #आईतुळजाभवानी #महाद्वार #व्यापारीआंदोलन #व्यापाऱ्यांनाआश्वासन #नगरपरिषदतुळजापूर #विनोदगंगणे #अजिंक्यरणदिवे #राणाजगजितसिंहपाटील #अतिक्रमणहटावमोहीम #महाद्वारचौक #भवानीरोड #स्थानिकबातम्या #धाराशिव #OsmanabadNews #MaharashtraNews #BreakingNews #VeerMaharashtraNews #वीरमहाराष्ट्रन्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 3, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026